आमच्याविषयी
"सर्व धर्म समभाव", "श्रदधा व सबुरीचा" संदेश देणाऱ्या श्री साईबाबा यांचे शिर्डी येथे जगप्रसिदध समाधी मंदिर आहे.
पुणतांबा येथे १२०० वर्ष तपश्चर्या करून योगीपदास पोहचलेल्या श्री चांगदेव महाराजांची समाधी गोदावरी नदीच्या काठावर आहे.
साकुरी येथे श्री साईबाबा यांचे समकालीन श्री उपासणी महाराज यांचे समाधीस्थळ आहे.
राहाता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य विरभद्र मंदिर आहे.
तालुक्यातील प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहीला शेतकऱ्यांच्या स्वमालकीचा सहकारी तत्वावरिल साखर कारखाना सहकार महर्षी पदमश्री डॉ. विठठलराव विखे पाटील यांनी १९४९ मध्ये उभारला.
त्यानंतर तालुक्यातील गणेशनगर येथे गणेश सहकारी साखर कारखाना उभारला गेला.
तालुक्यातील लोणी येथे सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण माजी केंद्रीय मंत्री बा बाळासाहेब विखे पाटील यांचे अथक प्रयत्नातून वैद्यकीय,
अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, संगीत, कला, या व इतर सर्व ज्ञानशाखांचे पदवी तसेच पदव्युत्तर व संशोधन क्षेत्रातील अभ्यासक्रम “ प्रवरा क्षिक्षण संस्था ” या
अभिमत विद्यापीठामार्फत गुणवत्ता पूर्ण क्षिक्षण दिले जाते.
कृषी व त्यावर आधारित व्यावसायिक क्षिक्षण व शेती तंत्राची माहिती, प्रगत तंत्रज्ञान अवगत होण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी “पायरेन्स”
या शेतकी प्रयोगशाळेची “बाभळेश्वर ” येथे स्थपना मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी कृषी व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांनी केली.
राहाता तालुका हा १०० % हागणदारी मुक्त ( ओडीएफ ) तालुका म्हंणून घोषित झाला आहे.