भारत हा कृषि प्रधान देश आहे. पंचायत समिती मधील हा विभाग ग्रामीण भागातील शेतक-यांचे
कृषि उत्पन्नात वाढ व्हावी या दृष्टिने कृषि विभागाच्या विविध योजना राबविण्यात
येतात. यामध्ये शेतक-यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे बाबत कृषि अधिकारी
व विस्तार अधिकारी यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात येते व शासनामार्फत तसेच पंचायत
समितीच्या उपकरातुन कृषि विषयक योजना राबविण्यात येतात.
तालुक्यात पश्चिमेकडून जसजसे पूर्वेकडे जावे तसतसे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. दुष्काळी
अतिपूर्व भागात सुमारे 400 ते 500 मिलीमिटर पाऊस पडतो. तर पश्चिमेकडील भागात 1100 ते
1200 मिलीमिटर पाऊस पडतो.
तालुक्यात खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने भात, बाजरी, भुईमूग व मका तसेच रब्बी हंगामामध्ये गहू,
हरभरा, रब्बी ज्वारी व मका इत्यादी पिके घेतली जातात.