कामाचे स्वरूप :-
- २००१ - २०२१ रस्ते विकास आराखडयानूसार ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा करणे.
- शासकीय निधी कामावर खर्च करतांना उपलब्ध निधीनुसार खर्चावर नियंत्रण राखणे.
- रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण व मुरुमीकरण करणे, छोटया मो-या बांधणे, शाळाखोल्या बांधणे
व किरकोळ स्वरुपाच्या दुरुस्तीची कामे करणे.
- कामावर देखरेख करुन कामें तांत्रिकदृष्टया योग्य होतात किंवा नाही ते पाहुन त्यांना
तांत्रिक दृष्टया मार्गदर्शन करणे.
- विविध योजनेची व विविध स्तरावरील कामे करुन घेणे.
- शासनाच्या विविध योजना शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राबविणे व तांत्रिक मान्यता
देणे.
- कामे प्रगतीपथावर राहणेसाठी योग्य ती उपाययोजना करणे, ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करणे.
- मुख्यालयातील दुरुस्ती व देखभाल - पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या पुणे शहरातील
इमारतींची देखभाल व दुरुस्ती या उपविभागामार्फत केली जाते. त्यामध्ये पाणीपुरवठा, मालमत्ता
कर इत्यादी बाबतचा समावेश आहे.
व्याप्ती :- रस्ते व इमारतीची विविध प्रकारची कामे विविध योजने अंतर्गत
वेगवेगळया खर्चाच्या सदरात या विभागामार्फत केली जातात. रस्ते विकास योजने अंतर्गत
बारामती तालुक्यातील 161 कि.मी. लांबीचे 15 इतर जिल्हा मार्ग व 1221.82 कि.मी. लांबीचे
423 ग्रामीण मार्गाचे रस्ते या विभागाच्या ताब्यात आहे. या रस्त्यांची नविन कामे, दुरुस्त्या
व देखभालीचा कार्यक्रम हा शासन व जि.प. अनुदान व लोकप्रतिनिधीची मागणी व महत्वाचे एस.टी.
मार्ग व मालवाहतूकीचे रस्ते इत्यादिवर अवलंबून असतो.
खात्यामध्ये कार्यरत असणा-या सर्व विषयाची यादी :-
- ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण ( बि.आ. )
- योजनेत्तर कार्यक्रम
- तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
- उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ
- ८ सार्वजनिक आरोग्य शासकीय निधी
- १२ वा वित्त आयोग
- रोजगार हमी योजना
- बांधा वापरा हस्तांतर करा
- मुख्यालयातील दुरुस्ती व देखभाल
- बांधकाम समिती सभा
- मैलकामगार आस्थापना