सा.प्र.विभागात पं.स.मधे आलेल्या व पं.स.मधून पाठीलेल्या सर्व पत्रांची नोंद ठेवण्यात येते.पं.स.मधील सर्व खातेप्रमुखांनी/खात्यांनी केलेल्या कामकाजाचा अहवाल एकत्रित करून जि.प.ला सादर करण्यात येतो. पं.स.च्या एकंदरीत कामकाजाचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून पं.स.च्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येतो.पं.स. मधील सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तके व इतर सेवा विषयक नोंदी ठेवण्यात येतात.जि.प. व पं.स.च्या समाजकल्याण व महिलाबालकल्याण विभागातील योजनांच्या साहित्याचे वाटप या विभागातून करण्यात येते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन अदा करणे व इतर नोंदी ठेवण्यात येतात.पं.स. च्या कार्यकारी मंडळाच्या मासिक सभांचे इतिवृत्त ठेवण्यात येते.