योजना
i.
राज्य शासन सहाय्यित योजना :-
अ)
योजनांतर्गत योजना :-
राज्य शासनाने पंचवार्षिक योजनेव्दारा निश्चित धोरणानुसार योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो . लघुपाटबंधारे योजना खालील प्रमाणे आहेत.
१. लघुपाटबंधारे (स्था.क्षेत्र) योजना :- तांत्रिकदृष्ट्या योग्यतेनुसार साठा बंधारे याची कामे हाती घेतली जातात . ज्या ठिकाणी नदी/
नाल्याच्या दोन्ही तीरावर पुरेशी उंची आहे अश्या ठिकाणी साठा बंधाऱ्यांची कामे घेतली जातात .अश्या प्रकारची साठा बंधाऱ्याची कामे घेण्यात येतात आता संपूर्ण
बंधाऱ्याचे काम सिमेंट कॉंक्रिटमध्ये करण्यात येत आहेत. या कामासाठी राज्य शासनाकडून योजनांतर्गत निधी प्राप्त होतो.आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रासाठी
स्वतंत्र पणे निधी उपलब्ध होत आहे. हि सामुहिक लाभाची योजना आहे.
२. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे घेणे(को.प.बंधारे):- ज्या ठिकाणी नदी / नाला पात्र उथळ आहे. व पुराचे पाणी मोठ्या स्वरूपात आहे. त्या ठिकाणी
को.प. बंधाऱ्याची कामे घेण्यात येतात. यात पुराचे पाणी सुरक्षित पणे जाण्यासाठी गेटची संख्या जास्त ठेवली जाते. व पावसाळ्यानंतर वाहून जाणारे नदी/नाल्यातील पाणी
आडवुन त्याचा सिंचनासाठी वापर करता येतो.५ दशलक्ष घनफूट क्षमतेपर्यंत पाणीसाठा होणाऱ्या व ३० हेक्टर पेक्षा जास्त सिंचन क्षेत्र उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी
प्रामुख्याने को.प.बंधारे घेतले जातात. या को.प.बंधाऱ्यांच्या कामासाठी राज्य शासनाकडून योजनांतर्गत अनुदान प्राप्त होत आहे. आदिवासी व बिगर आदिवासी
क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे निधी प्राप्त होत आहे.
2. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना :-
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विधेयक दिनांक २ सप्टेंबर २००५ रोजी मंजुर करण्यात आले उपलब्ध करुन देण्याची हमी देण्यात आलेली आहे. या योजने व्दारे सर्व नोंदणी
झालेल्या कुटुंबाना फोटोसहीत रोजगार पत्रीका(जॉब कार्ड)व ओळखपत्र दिले जाते. या योजनेमध्ये कामाची निवड, नियोजन, अंमलबजावणी या मध्ये ग्रामपंचायत चा संपूर्ण
सहभाग असतो. यामध्ये योजनेच्या एकुण नियोजनाच्या किमान ५० टक्के कामे ग्रामपंचायत मार्फत राबविले जातात.